पप्पा झाले कोयता
पप्पा कोयता झाले... अलोक पवार मराठवाड्यातील आमचा बीड जिल्हा. बीड जिल्हा का माहिती पण महाराष्ट्रातील बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेने का काय थोडासा शापितच वाटतो. मी अगदीच शेतकरी कुटुंबातला. पण बीडची जी परिस्थिती आहे तिचा अनुभव पप्पांनी जसा घेतला आहे तसा माझ्या वाटेला येऊ नये म्हणून लहानपणी माझी रवानगी नगरला झाली. पाण्यासाठी नेहमीच दारिद्री राहिलेल्या बीडशी माझे शैक्षणिक, सामाजिक आणि अगदीच माझ्या घरच्यांची नाती दूर झाली. कधी पाऊस नाही कधी शेत असून पिक नाही तर पोटच्या लेकाला पण तेच भोग नशिबी यायला नको म्हणून मी नगरच्या माझ्या आत्याकडे राहायला आलो होतो. अगदी पाचवीपासून माझा सांभाळ तिनेच केला. मला अगदीच देवकी आणि यशोदा अशा दोन मातोश्री लाभल्या होत्या म्हणायला हरकत नाही. पण लीला दाखवायला माझे गाव माझ्यापासून तुटले होते. मी पाचवीत असताना मला मोठे झाल्याचे भान नसून पण असे आणावे लागायचे. तेंव्हा तर माझा थाट अगदी परदेशात शिकायला जाणारे तरुण असतात ना त्यांच्यासारखा होता. म्हणजे माझ्या गावापासून लांब शाळेसाठी आलो होतो. पप्पांनी मला योग्य शिक्षण मिळावे म्हणून दूर ठेवले होते. माझी दहावी झा...